आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था / From Wikipedia, the free encyclopedia
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (इंग्लिश International Monetary Fund लघुरूप IMF, आयएमएफ) ही सदस्य राष्ट्रांना मुख्यतः विनिमय दरावर आणि देवघेवींच्या ताळेबंदावर प्रभाव टाकणाऱ्या बृहत-अर्थशास्त्रीय धोरणांबाबत पाठपुरावा करावयास लावून जागतिक वित्तीय व्यवस्थेवर लक्ष ठेवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. आंतरराष्ट्रीय विनिमय दरांमध्ये स्थिरता आणणे आणि कर्जे, पुनर्रचना किंवा मदतीच्या मोबदल्यात इतर राष्ट्रांना आपली आर्थिक धोरणे अधिक उदार बनवावयास लावून विकास घडवून आणण्याचे घोषित ध्येय असणारी ही संस्था आहे. मुख्यतः गरीब राष्ट्रांना ती अल्पकालीन कर्जे देते. तिचे मुख्यालय संयुक्त संस्थानातील वॉशिंग्टन, डिस्ट्रिक्ट ऑफ कोलम्बिया इथे आहे.
जलद तथ्य स्थापना, उद्देश्य ...
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे अधिकृत बोधचिन्ह | |
स्थापना | २७ डिसेंबर, १९४५ |
---|---|
उद्देश्य | आंतरराष्ट्रीय व्यापारातील देवाण-घेवाणीत समतोल राखणे. |
मुख्यालय | वॉशिंग्टन, डी.सी., अमेरिका |
अधिकृत भाषा | इंग्लिश, फ्रेंच आणि स्पॅनिश |
व्यवस्थापकीय संचालक | क्रिस्टालिना जॉर्जिव्हा |
संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
बंद करा