फुकुओका पेपे डोम
From Wikipedia, the free encyclopedia
फुकुओका पेपे डोम (福岡ペイペイドーム?) हे एक बेसबॉलचे मैदान आहे. जपानच्या चौकु, फुकुओका येथे स्थित आहे. १९९३ मध्ये बांधलेल्या या स्टेडियमचे मूळ नाव फुकुओका डोम (福岡ドーム?) होते. याची प्रेक्षक क्षमता ३८,५८५ आसनांची आहे.[1][2] याच्या मैदानाचा व्यास २१६ मीटर आहे. फुकुओका पेपे डोम हा जगातील सर्वात मोठा भौगोलिक घुमट आहे.[3] मागे-पुढे होणारे छत असणारे जपानचे हे पहिले स्टेडियम आहे. २००५ मध्ये, याहू! जपान, सॉफ्टबँकच्या सहाय्यक कंपन्यांपैकी एक, या कंपनीने स्टेडियमचे नामकरणाचे हक्क संपादन केले आणि त्याचे नाव फुकुओका याहू जपान डोम (福岡Yahoo! JAPANドーム?) आणि याचे छोटे नावे याहू डोम (ヤフードーム?) असे ठेवले.[4] जानेवारी २०१३ मध्ये त्याचे नाव फुकुओका याफुओकु डोम (福岡 ヤフオク! ドーム?) असे ठेवण्यात आले.[5] जपान मध्ये याफुओकू म्हणजे याहू! लिलाव . ३० ऑक्टोबर २०१९ रोजी घोषित करण्यात आले होते की २९ फेब्रुवारी २०२० पासून स्टेडियमचे नाव फुकुओका पेपे डोम असे होईल.[6][7] हे नाव पेपे नावाच्या कंपनीला समर्पित आहे, या कंपनीत सॉफ्टबँकचे ५०% आणि याहू जपानचे २५% समभाग आहेत.
फुकुओका पेपे डोम | |
---|---|
मागील नावे | फुकुओका डोम |
गुणक | 33°35′43″N 130°21′44″E |
चालविणारे (ऑपरेटर) | हॉक्स टाऊन कंपनी |
वरचा पृष्ठभाग (सरफेस) |
फिल्डटर्फ २००९ पासून ॲस्ट्रोटर्फ १९९३ ते २००८ |
बांधकाम खर्च | ¥76 billions |
आर्किटेक्ट | टेकनाका कॉर्पोरेशन आणि मॅडा कॉर्पोरेशन |
सामान्य कंत्राटदार | टेकनाका कॉर्पोरेशन आणि मॅडा कॉर्पोरेशन |
फील्ड परिमाण |
डावे फिल्ड – १०० मीटर (३२८ फूट) डावे - मध्य – ११८ मीटर (३८७ फूट) मध्य फिल्ड – १२२ मीटर (४०० फूट) उजवे - मध्य – ११८ मीटर (३८७ फूट) उजवे फिल्ड – १०० मीटर (३२८ फूट) बाहेरील कुंपणाची उंची: ५.८४ मीटर (१९ फूट) |