बॉलीवूड
हिंदी भाषेतील चित्रपट उद्योग / From Wikipedia, the free encyclopedia
मुंबई येथे असलेल्या हिंदी चित्रपट सृष्टीला अनौपचारिकपणे बॉलिवुड असे म्हणतात. बऱ्याचदा बॉलिवुड ही संज्ञा संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीसाठी वापरली जाते, परंतु प्रत्यक्षात बॉलिवुड हा भारतीय चित्रपटसृष्टीचा एक हिस्सा आहे[1]. बॉलीवूड भारतातील सगळ्यात मोठी चित्रपटसृष्टी असून, ती जगातील मोठ्या चित्रपटसृष्टींपैकी आहे त्यामुळे त्याला स्वप्न नागरी असेही म्हणतात [2][3][4]
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या. कृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.
|
बॉलीवूडला औपचारिकपणे हिंदी सिनेमा म्हणून संबोधले जाते,,[5] परंतु या हिंदी चित्रपटांत काव्यात्मक उर्दू शब्दांचा वारंवार वापर सामान्य आहे. संवाद आणि गाण्यांमध्येही भारतीय इंग्रजीचा वाढता वापर आहे. इंग्रजी शब्द आणि वाक्प्रचार किंवा अगदी संपूर्ण वाक्यांसह संवाद दर्शविणारे चित्रपट दुर्लभ नाहीत.[6]