भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)
From Wikipedia, the free encyclopedia
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण ही संस्था भारतातील महामार्गांची बांधणी व देखभाल करते. भारताच्या अर्थव्यवस्थेत या महामार्गांच्या जाळ्याचा मोठा व महत्त्वाचा वाटा आहे. या महामार्गांची एकूण लांबी सुमारे ५८,००० कि.मी आहे, पैकी ४,८८५ कि.मी. लांबीचा रस्ता जाण्या-येण्याच्या मार्गिकांमध्ये दुभागलेला आहे.
यातील बहुतेक महामार्गांवर २+२ मार्गिका असतात. विकसित भागात अनेकदा हे ४+४ मार्गिकांइतके रुंद होतात तर मोठ्या शहरांमध्ये ८+८ मार्गिकांचे महामार्गही आहेत. भारतातील एकूण रस्त्यांच्या लांबीपैकी फक्त २% रस्ते महामार्ग आहेत पण त्यांवरून सुमारे ४०% वाहनांची वाहतूक होते. राष्ट्रीय महामार्ग (सुधारित) कायदा, १९९५नुसार महामार्गांची बांधणी व देखभालीसाठी खाजगी उद्योगांनाही मुभा मिळाली आहे.
रा.म. ७ हा वाराणसीपासून कन्याकुमारी पर्यंतचा महामार्ग सगळ्यात जास्त लांबीचा आहे. जबलपूर, नागपूर, हैदराबाद व बंगलोर मार्गे जाणारा हा रस्ता २,३६९ कि.मी. लांबीचा आहे. रा.म. ४७अ हा महामार्ग सगळ्यात छोटा आहे. ६ कि.मी. लांबीचा हा रस्ता एर्नाकुलमला कोचीन बंदराशी जोडतो. मनालीपासून लेहला जाणारा महामार्ग जगातील सगळ्यात उंचीवरचा महामार्ग आहे.
भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी अशी :