यष्टिरक्षक
क्रिकेट खेळातील एक संरक्षक करनारा खेळाडू / From Wikipedia, the free encyclopedia
यष्टिरक्षक हा क्रिकेट खेळामधील एक खेळाडू आहे जो त्याचा संघ क्षेत्ररक्षण करीत असताना स्टंप्सच्या मागे उभा राहतो. जर द्रुतगती गोलंदाजी चालू असेल तर यष्टीरक्षक यष्ट्यांपासून लांब उभा राहतो व फिरकी गोलंदाजी चालू असताना यष्ट्यांच्या जवळ उभा राहतो. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये केवळ यष्टीरक्षकालाच हातमोजे (ग्लोव्ह्ज) व पायांना पॅड्स बांधायची परवानगी आहे. यष्टिरक्षकाची कर्तव्ये खालीलप्रमाणे:
- फलंदाजाच्या बॅटचा कडा घेऊन आलेले चेंडू झेलणे.
- फलंदाज आपल्या क्रीझच्या बाहेर पडला असेल त्याला यष्टिचीत करण्याचा प्रयत्ना करणे.
- क्षेत्ररक्षकाने फेकलेला चेंडू पकडून धावा घेत असलेल्या फलंदाजांना धावचीत करण्याचा प्रयत्न करणे.
क्रिकेटच्या नियमांनुसार सामन्यादरम्यान यष्टीरक्षक जखमी अथवा जायबंदी झाल्यास बदली यष्टिरक्षकाला बोलावता येत नाही. क्षेत्ररक्षण करणाऱ्या इतर १० खेळाडूंपैकी एकालाच हे काम सांभाळावे लागते.