विकिपीडिया:समाज मुखपृष्ठ/चहा
From Wikipedia, the free encyclopedia
साचा:Essay
’चहा पिणे’ म्हणजे लाक्षणिक अर्थाने एखादे पेय पिणे आणि विचारपूस करणे. एकत्र बसून चहा पिऊ या असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा चहाच पितो असे नाही, तर तिथे चहाच्या ऐवजी कॉफी किंवा सरबतपण असू शकते. उष्ण प्रदेशात असाल तर लिंबूसरबत, लस्सी किंवा तसलेच एखादे सुंदरपैकी शीतपेय घ्यायला काहीच हरकत नाही.
एकदा सुंदर चहाचा एक कप व बैठक जमली की एका सुसंवादाला सुरुवात होते. अशा बैठकीत बसलेल्या इतर सदस्यांशी चांगला परिचय होतो आणि प्रत्येकाचे समाजातील स्थान आणि त्याने समाजाला केलेले योगदान याची कल्पना येते. चांगल्या विषयांवरील गप्पांमधून सुजाणभाव निर्माण होतो. " जर तुम्ही काही चांगले बोलू शकत नसाल तर बोलूच नका ", असा आदर्शवाद मनात बाळगणारी माणसे, बैठकीत विवाद होऊच देत नाहीत.
चहापानावरचा हा लेख ज्यांना आवडेल त्यांनी लेखाच्या चर्चापानावर केवळ शुभेच्छा देऊन थांबू नये. त्याहीपलीकडे जाऊन जेव्हा अत्युच्च चांगुलपणाची गरज भासेल तेव्हा कुठलीही औपचारिकता न दाखवता आपला अभिप्राय नोंदवावा.
"मला वाटते की, अमक्या व तमक्याने विकिपीडियावर फारच मेहनत घेतली, पण........." असे सांगण्याची आपणास ऊर्मी आलीच तर आपण ’पण’पूर्वीच थांबा. चांगला अभिप्राय देण्यासाठी पण/किंतु/परंतु/तरीही असल्या शब्दापूर्वीच लेखणी आवरती घ्यावी असा अलिखित संकेत आहे. फक्त चांगल्या अभिप्रायाचाच भाग तेवढा आपल्या हातातून कागदावर किंवा संगणकाच्या पडद्यावर उतरू द्यावा.
अभिप्रायाचे आपले ओतणे/टाकणे झाले की, आपणास {{पर्याय:विकिचहा}} हा साचा चर्चा पानावर लावणे आवश्यक वाटेल. आणि मग सर्वांना बोलावून सांगू या की ’चहा तयार आहे.चला घेऊ या.’ साचा:Barnstarpages