विद्या सिन्हा
From Wikipedia, the free encyclopedia
विद्या सिन्हा (जन्म : मुंबई, १५ नोव्हेंबर १९४७; - मुंबई, १५ ऑगस्ट २०१९) ही एक हिंदी चित्रपटांत काम करणारी भारतीय चित्रपट अभिनेत्री होती. तिचे १९७७ या वर्षात लागोपाठ ६ चित्रपट प्रदर्शित झाले होते.
विद्या सिन्हा हिची दोन लग्ने झाली, पहिले वेंकटेश्वर अय्यर याच्याशी, तर दुसरे नेताजी भीमराव साळुंखे याच्याशी. दोन्ही विवाहांनंतर तिने घटस्फोट घेतला होता.