सोत्शी
From Wikipedia, the free encyclopedia
सोत्शी (रशियन: Сочи; लेखनभेदः सोची) हे रशिया देशाच्या क्रास्नोदर क्राय मधील एक शहर आहे. सोत्शी शहर जॉर्जिया देशाच्या अबखाझिया ह्या वादग्रस्त प्रदेशाच्या सीमेजवळ कॉकासस पर्वतरांगेत व काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. २०१० सालच्या गणनेनुसार सोत्शी शहराची लोकसंख्या ३.४३ लाख इतकी होती.
जलद तथ्य
सोत्शी Сочи |
|||
रशियामधील शहर | |||
|
|||
सोत्शीचे रशियामधील स्थान | |||
गुणक: 43°35′7″N 39°43′13″E |
|||
देश | रशिया | ||
राज्य | क्रास्नोदर क्राय | ||
स्थापना वर्ष | इ.स. १८३८ | ||
क्षेत्रफळ | ३,५०५ चौ. किमी (१,३५३ चौ. मैल) | ||
लोकसंख्या (२०१०) | |||
- शहर | ३,४३,२८५ | ||
- घनता | ९८ /चौ. किमी (२५० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी + ४:०० | ||
अधिकृत संकेतस्थळ |
बंद करा
२०१४ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांचे सोची हे यजमान शहर आहे. तसेच २०१४ सालापासून फॉर्म्युला वनची रशियन ग्रांप्री सोची येथे खेळवली जाईल. २०१८ फिफा विश्वचषकासाठीच्या यजमान शहरांमध्ये सोचीचा समावेश केला गेला आहे.
सोत्शी कॉकासस भौगोलिक प्रदेशामधील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. रशियामधील इतर शहरांच्या तुलनेत येथील हवामान सौम्य असते.