चांदी
From Wikipedia, the free encyclopedia
चांदी हा एक खूप मौल्यवान धातू आहे .
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
(Ag) (अणुक्रमांक ४७) रासायनिक पदार्थ. इंग्लिश नाव सिल्व्हर. शास्त्रीय नाव आर्जेन्टिनम. चाँदी एक चमकणारी आणि बहुमूल्य धातु आहे. याचे परमाणु क्रमांक 47 आणि परमाणु द्रव्यमान 107.9 आहे. हे एक तन्य धातु असल्याने याचे उपयोग तार आणि आभूषण बनविण्यासाठी होताे.
चाँदी सर्वोत्तम विद्युतचालक आणि ऊष्माचालक धातु आहे.
सामान्य गुणधर्म | |
---|---|
साधारण अणुभार (Ar, standard) | १०७.८८ ग्रॅ/मोल |
चांदी - आवर्तसारणीमधे | |
अणुक्रमांक (Z) | ४७ |
गण | अज्ञात गण |
श्रेणी | संक्रामक (धातू) |
भौतिक गुणधर्म | |
स्थिती at STP | घन |
विलयबिंदू | १२३५ °K (९६२ °C, १७६३ °F) |
क्वथनबिंदू (उत्कलनबिंदू) | २४३५ °K (२१६२ °C, ३९२४ °F) |
घनता (at STP) | १०.४९ ग्रॅ/लि |
आण्विक गुणधर्म | |
इतर माहिती | |
संदर्भ | चांदी विकीडाटामधे |
चांदी हा एक चमकदार मौल्यवान धातू आहे. लॅटिनभाषेत "चमकदार" किंवा "पांढरा" ह्या शब्दाला आर्जेन्टमअसे म्हणतात. त्यामुळेच Ag असे चिन्ह चांदीसाठी वापरले जाते. शुद्ध, मुक्त मूलभूत स्वरूपात चांदी, सोने आणि इतर धातूंचे मिश्रण आर्जेन्टिटा आणि क्लोरारगिराइट सारख्या खनिजांमध्ये आढळते. बहुतेक चांदी तांबे, सोने, शिसे आणि झिंक ह्या धातूंच्या परिष्करण प्रक्रियेतून उत्पादित केले जाते.
चांदीचा फार आधीपासून चलनातील नाण्यांमध्ये वापर केला गेला आहे. चलना व्यतिरिक्त, गुंतवणूकीचे माध्यम म्हणून (नाणी व सराफा) चांदीचा वापर केला जातो. सौरऊर्जा पटल, दागिने आणि भांडी ह्यात चांदीचा विशेष वापर होतो. विद्युत उपकरणे, रासायनिक प्रतिक्रियांचे उत्प्रेरक, आरसे बनवण्यात चांदी वापरली जाते. तसेच चांदीची संयुगे फोटोग्राफिक आणि एक्स-रे फिल्ममध्ये वापरली जातात. चांदीच्या नायट्रेट आणि इतर चांदीच्या संयुगेचे जंतुनाशक म्हणून वापरले जाते.