पॅरिस
From Wikipedia, the free encyclopedia
पॅरिस (फ्रेंच: Paris पारि (सहाय्य·माहिती)) ही फ्रान्स देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. उत्तर फ्रान्समध्ये इल-दा-फ्रान्स ह्या प्रांतात सीन नदीच्या काठावर वसलेले पॅरिस महानगर (फ्रेंच: Région parisienne) युरोपातील सर्वाधिक लोकसंख्येच्या महानगरांपैकी एक आहे.[1] पॅरिस शहराची लोकसंख्या २१,९३,०३१ इतकी तर महानगर पॅरिसची लोकसंख्या १,१८,३६,९७० एवढी आहे.[2]
पॅरिस Paris |
|||
फ्रान्स देशाची राजधानी | |||
वरून घडाळ्याच्या काट्याप्रमाणे: लूव्र, आर्क दे त्रायॉं, व्हर्सायचा राजवाडा, सीन नदीवरील अनेक पूल व पार्श्वभूमीमधील अनेक ऐतिहासिक वस्तू, व आयफेल टॉवर |
|||
|
|||
गुणक: 48°51′24″N 2°21′30″E |
|||
देश | फ्रान्स | ||
प्रांत | इल-दा-फ्रान्स | ||
स्थापना वर्ष | इ.स. पूर्व ४२०० | ||
महापौर | बरत्रां देलानोए | ||
क्षेत्रफळ | ८६.९ चौ. किमी (३३.६ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | २२,०३,८१७ | ||
- घनता | २५,३६० /चौ. किमी (६५,७०० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | मध्य युरोपीय प्रमाणवेळ | ||
http://www.paris.fr |
राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, कला व क्रीडा ह्या सर्व क्षेत्रात फ्रान्समध्ये अग्रेसर असणारे पॅरिस हे एक महत्त्वाचे जागतिक शहर मानले जाते.[3] येथे युनेस्को, आर्थिक सहयोग व विकास संघटना इत्यादी अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांची मुख्यालये आहेत.
पॅरिस महानगराचे एकूण उत्पन्न ५५२.७ अब्ज युरो[4] एवढे असून ते युरोपामध्ये सर्वांत जास्त तर जगात सहाव्या क्रमांकावर आहे.[5] २०१० साली घेण्यात आलेल्या एका अहवालानुसार पॅरिस हे जगातील सर्वांत महागडे शहर आहे.[6] २००९[7] व २०१०[8][9] साली पॅरिसला जगातील सर्वोच्च ३ महत्त्वाच्या व प्रभावशाली शहरांमध्ये स्थान मिळाले आहे. २०२०[10] व २०२५[11] सालामधील जगातील १० सर्वांत श्रीमंत व समृद्ध शहरांमध्ये देखील पॅरिसचा उल्लेख आहे. ह्या गटातील इतर शहरे शांघाय, साओ पाउलो, टोकियो, न्यू यॉर्क व लंडन ही आहेत.
पॅरिस हे जगातील सर्वांत लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे. येथे दरवर्षी अंदाजे ४.५ कोटी लोक भेट देतात.[12] जगप्रसिद्ध आयफेल टॉवर व लूव्र संग्रहालय तसेच इतर अनेक ऐतिहासिक वास्तू, संग्रहालये व उद्याने पॅरिसमध्ये आहेत.