२०१४ हिवाळी ऑलिंपिक
From Wikipedia, the free encyclopedia
२०१४ हिवाळी ऑलिंपिक ही हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा स्पर्धेची २२वी आवृत्ती आहे. ही स्पर्धा ७ ते फेब्रुवारी २३ दरम्यान रशिया देशाच्या क्रास्नोदर क्रायमधील सोत्शी ह्या शहरामध्ये खेळवली जात आहे.
२०१४ हिवाळी ऑलिंपिक XXII हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा | |
---|---|
यजमान शहर | सोत्शी रशिया
|
सहभागी देश | ८८ |
सहभागी खेळाडू | २,८०० (अंदाजे) |
स्पर्धा | ९८, १५ खेळात |
समारंभ | |
उद्घाटन | फेब्रुवारी ७
|
सांगता | फेब्रुवारी २३ |
अधिकृत उद्घाटक | व्लादिमिर पुतिन |
खेळाडूंची प्रतिज्ञा | रुस्लान झाकारोव्ह |
मैदान | फिश्त ऑलिंपिक स्टेडियम
|
◄◄ २०१० २०१८ ►► |
ह्या स्पर्धेसाठी सोत्शीची निवड ४ जुलै २००७ रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या ग्वातेमाला सिटी येथे झालेल्या बैठकीमध्ये करण्यात आली. यजमानपदासाठी ऑस्ट्रियामधील जाल्त्सबुर्ग व दक्षिण कोरियामधील प्याँगचँग ही इतर शहरे उत्सुक होती. सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर रशियामध्ये खेळवली जाणारी ही पहिलीच ऑलिंपिक स्पर्धा आहे.
ह्या स्पर्धेसाठी रशियामधील काळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर संपूर्णपणे नवीन क्रीडा संकूल बांधले गेले आहे. ह्या स्पर्धेसाठी पायाभूत सुविधा (रेल्वे, महामार्ग, विमानतळ) सुधारण्यासाठी तसेच अनेक सोयी नव्याने बांधण्यासाठी एकूण ५१ अब्ज अमेरिकन डॉलर इतका खर्च आला आहे. सोत्शी २०१४ ही आजवरच्या इतिहासामधील सर्वात खर्चिक क्रीडा स्पर्धा आहे.